Rte प्रवेशासाठी मुदतवाढ :- वाचा कधीपर्यंत आहे मुदत

 Rte प्रवेशासाठी मुदतवाढ 

 नमस्कार मित्रानो सरकारी नोकरीवर तुमचे स्वागत आहे. शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये म्हणून शासनाने शिक्षण हक्क कायदा आणला. गरजू व गरीब घटकातील मुलांना इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी २५% जागा या वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव असतात. यासाठी अर्ज भरून लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाते. पालक आपल्या मुलांचा नंबर लागतो कि नाही,यासाठी sms ची वाट पाहत होते. हे sms १२ एप्रिल पासून पाठवण्यात आले आहे. आर टी ई चे संकेतस्थळ सातत्याने बंद पडत होते त्यामुळे मुलांच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने पर्यायी website उपलब्ध करून दिली आहे.Rte कोट्यातील जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली.


पालकांमध्ये गोंधळ:- Rte च्या प्रवेशासाठी पालक प्रतीक्षेत होते. बालकांच्या प्रवेशासाठी प्रवेशासाठी पालकांना sms जाण्यास सुरुवात झाली पण प्रवेशाचे संकेतस्थळ बंद पडल्याने आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला कि नाही हे पाहता येत नव्हते. यामुळे पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले याची दाखल शिक्षण विभागाने घेतली व माहिती पाहण्यासाठी पर्यायी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले.

पोर्टलवर पालकांसाठी विशेष सूचना:-

१)      Rte २५ टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भर येत असल्यामुळे पालकांना तांत्रिक अडचण येत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी याबाबत पालकांनी संभ्रम बाळगू नये.तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येईल.

२)      Rte online प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने परत प्रयत्न करावा.

३)      निवड यादीतील पात्र बालकांच्या पालकांनी Rte पोर्टलवरील  अर्जाची स्थिती या tab वर आपला अर्ज क्रमांक लिहून admit card ची प्रिंट काढावी तसेच हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.

४)      ऍडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच   वापर करावा

५)      अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.

६)      प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.

७)       निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना   अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील. अशी माहिती Rte पोर्टल दिली आहे. 

     Rte प्रवेशासाठी मुदतवाढ :- निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश   घेण्याची मुदत १३ एप्रिल २०२३ पासून ते ८ मे २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे याची पालकांनी   नोंद घ्यावी.

माहिती आवडल्यास गरजू लोकांपर्यंत पाठवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हि वेबसाईट नोकरी जाहिराती संबंधी आहे. हि वेबसाईट सरकारी नसून प्रायवेट आहे.कुठल्याही स्पॅम कमेंट घेतल्या जाणार नाही.

Blogger द्वारे प्रायोजित.